पुणे : महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असणारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे व बैठका घेत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या दोन महापालिका म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्म पुण्यातला आहे. इथे त्यांनी अनेक माणसं जोडली, सभा घेतल्या. पण पुणे आणि पिंपरीत शिवसेनेचा भगवा फडकू शकला नाही, ही खंत मनात कायम आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे,’ अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड मध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी तुफान टोलेबाजी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील त्यांनी लक्ष्य केलं.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही- सी. टी. रवी
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

