🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अधिवेशनातील भाषणामध्ये भाजपवर टीकास्त्र डागताना शिवसेनेच्या हिंदुत्वावरून आरोप करणाऱ्या भाजपला देखील लक्ष्य केलं होते. शिवसेनेचं हिदुत्व हे बाळासाहेबांचं हिदुत्व आहे. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का देत नाहीत?’ असा सवाल त्यांनी भाजपला केला होता.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले बोलत होते, ते म्हणाले कि, ‘सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी ही शिवसेनेची वैयक्तिक भूमिका आहे. महाविकास आघाडीची ही भूमिका नाही. असे वक्तव्य केले त्यांनी केले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
Bharat Ratna should be conferred upon Savitribai Phule and Shahuji Maharaj. Shiv Sena's stand is not our stand: Maharashtra Congress Chief Nana Patole on Shiv Sena's demand for Bharat Ratna to Vinayak Damodar Savarkar pic.twitter.com/jYGO6w94dK
— ANI (@ANI) March 5, 2021
नाना पटोले म्हणाले कि, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारतरत्न प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारची समस्या नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, भाजपाने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षाला हिंदुत्व शिकवू नये. सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविले होते. भारतरत्न कोणाला देतात? पंतप्रधान आणि समितीचा हा हक्क आहे. वीर सावरकरांबद्दल शिवसेनेने कधीही आपली भूमिका बदलली नाही, असेही त्यांनी म्हंटले होते.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार असल्याचा भाजपचा दावा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे.जे. रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा डोस
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
