हिंगोली : जिल्ह्यात शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. वसमत येथील शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा नेहमीच कुठल्या नाही तर कुठल्या कारकाने चर्चेत असतात, त्यांच्यावर नेहमीच शिवसेनेसोबत गद्दारी केल्याचा आरोप होत आलेला आहे. आता खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा डॉ. मुंदडांनी गद्दारी केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला आहे.
शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही पक्षात असतांना दोन चोरांनी गद्दारी केल्यामुळेच आपण लोकसभेत पराभूत झालो असा आरोप माजी आमदार गजानन घुगे आणि माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्यावर करीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. आता शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आहेत. त्यांनी सुद्धा डॉ. जयप्रकाश मुंदडा हे गद्दार असल्याचा आरोप शिवसेनेच्या बैठकीत केला आहे. वसमत येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा आगमनाला मिरवणूक काढून गर्दी केल्याने खासदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे, डॉ जयप्रकाश मुंदडा, पुतळा समिती सदस्यासह पाचशे शिवभक्तांवर वसमत पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्हे माघे घेण्यात यावेत यामागणीसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत खासदार हेमंत पाटील यांनी डॉ जयप्रकाश मुंदडा यांना गद्दार ठरवीत चांगलाच संताप व्यक्त केला.
यामुळे शिवसेनेतील गटबाजी समोर आली आहे. हेमंत पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील नसून ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभेतील आहेत, असा अपप्रचार डॉ. मुंदडांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केला होता, असा आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. मुंदडा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवसेना सोडून मतदाराला मतदान करा असा प्रचार केल्याच्या त्यांच्या क्लिप आहेत असं ही खासदार हेमंत पाटील म्हणाले. वसमत येथील तालुका प्रमुखाला आणि दोन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना हाकला म्हणून डॉ. मुंदडा वरिष्ठांकडे जाऊन बसले ही पक्षविरोधी कारवाई आहे. आम्ही डॉक्टर मुंदडा यांची तक्रार करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहोत. ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला मोठं केलं त्याच शैवसैनिकांची गळचेपी तुम्ही करणार असाल तर शिवसैनिक तुम्हाला पायदळी तुडविल्याशिवाय राहणार नाहीत, असा गर्भित ईशाराही यावेळी हेमंत पाटील यांनी डॉ. मुंदडा यांना दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
