Share

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ‘ऑनलाईन’ नाहीच; राऊतांचे स्पष्टीकरण

Published On: 

नवी दिल्ली : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून तो कशा पद्धतीने साजरा केला जाईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशीच इच्छा आहे. असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला आहे. यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर होण्याचे संकेतही राऊतांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा दसरा मेळावा शिवतीर्थावर साजरा करता आला नाही. अगदी महत्वाच्या नेत्यांच्या हजेरीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला होता. परंतु आता कोरोनाचे संकट असेरले असून तीसऱ्या लाटेचा धोका नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर दसरा मेळावा घेण्यासंबंधी हालचालींना वेग आला आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचे पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील तशीच इच्छा आहे. सध्या चर्चा सुरु असून अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

तिसऱ्या लाटेचा धोका नाही 

मुंबई शहरातील ४२ लाख नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ८२ लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे पालिकेने न्यायालयात सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!