नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आपली प्रतिष्टा पणाला लावली आहे. या राजकीय पक्षातील नेत्यांनी आपल्या नातलगांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत आणखीनच चुरस वाढली आहे.
रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या ११ तर पंचायत समितीच्या १४ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपा नेत्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोडदा गटातून भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपा नेते डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांना कोपरली गटातून उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेसचे आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या बहिणीला खापर गटातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवससेना नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा मुलगा राम रघुवंशी यांना कोपर्ली गटातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्व प्राप्त झाले असून सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषदेच्या ११ जागा रिक्त झाल्या होत्या या ११ तर पंचायत समितीच्या १४ इतक्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वी काँग्रेसकडे एकूण २३ जागा होत्या तर भाजपाकडेही २३ जागा होत्या तसेच शिवसेनेकडे ७ जागा होत्या. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने भाजपाला मोठा तोटा सहन करावा लागला असून भाजपचे ११ पैकी ७ सदस्या अपात्र ठरले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या सहन केल्या जाणार नाहीत- मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी
- ‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

