मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देऊन लागोपाठ तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपने धक्काच दिला नाही, तर औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केल्याची मुंडे समर्थकांत चर्चा आहे. एकापाठोपाठच्या घटनांमुळे पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींची नाराजी या राजकीय मौनातून उघड उघड दिसत आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे अशी शंका शिवसेनेने सामना संपादकीयमधून व्यक्त केली आहे.
‘भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.’
‘मुंडे भगिनी ह्या वंजारी समाजातून येतात. भागवत कराडही वंजारी समाजातूनच येतात. पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर वंजारी समाज भाजपावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. एवढच नाही तर पंकजा मुंडे यांनीही पक्षावर उघड उघड नाराजी व्यक्त केली. त्याच पार्श्वभूमीवर पंकजांना विधान परिषदेवर घेतलं जाईल अशी जोरदार चर्चा सुरु झाली. पण प्रत्यक्षात लातूरच्याच रमेश कराड, जे भाजपातून राष्ट्रवादीत आणि पुन्हा भाजपात आले होते, त्यांना आमदार केलं गेलं. म्हणजे चर्चा पंकजांची आणि आमदारकी रमेश कराड यांना. रमेश कराडही वंजारी समाजातून येतात.’
‘आताही मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची जशीही बातमी आली तशी प्रीतम मुंडे यांना मंत्री केलं जाईल अशी चर्चा सुरु झाली. पण प्रत्यक्षात भाजपानं राज्यसभेवर घेतलेल्या भागवत कराडांना मंत्री केलं. भागवत कराड हे औरंगाबादचे दोन वेळेस महापौर राहीले. गोपीनाथ मुंडेंनी त्यांना आमदारकीचं तिकिटही दिलं होतं पण ते निवडून नाही आले. त्यानंतर आता भाजपानं प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराडांना केंद्रातल्या मंत्रीपदासाठी पसंती दिली. सामनातल्या अग्रलेखात यावरच बोट ठेवण्यात आलंय. प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराडांना मंत्रिपद म्हणजे वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न तसच पंकजा मुंडें यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे’ असे ‘सामना’त म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बीड, उस्मानाबादच्या हक्काच्या पाण्यासाठी आ.धस यांनी विधिमंडळात उठवला आवाज
- ‘अजित पवारांनी शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा’, आ.विनायक मेटेंची मागणी
- बुडाखाली अंधार! भाजप आ.लक्ष्मण पवार यांचा नगरसेवकच निघाला वाळूमाफिया
- मराठवाड्यात दमदार पाऊस; पिके बहरणार, मशागतीच्या कामांना वेग येणार
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
