🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
ईडीने त्यांना 29 डिसेंबरला हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, वर्षा राऊत यांनी ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर होण्यासाठी अधिकचा अवधी हवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार, ईडीने त्यांना ५ जानेवारी म्हणजेच उद्या हजर होण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, त्या अचानकपणे आजच ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
त्यामुळे आज काय चौकशी होणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं असून त्यांच्या अचानक हजर होण्याने चर्चांना देखील उधाण आलं आहे. प्रसारमाध्यमांना हुलकावणी देत त्या हजर झाल्या आहेत. यामागे गोंधळाची परिस्थिती निर्माण न होता ईडीला सहकार्य करण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
वर्षा राऊत नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात गेल्याने भाजप आमदार राम कदम यांनी व्यक्तिशः टीका करण्याचे टाळत असल्याचे सांगितले. तर या बँकेमुळे अनेक मध्यमवर्गीयांचे पैसे बुडाले आहेत. त्यामुळे त्यांनी या सरकारी यंत्रणांना कायदेशीर रित्या सहकार्य करणे प्रथम कर्तव्य असल्याचे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता; बाळासाहेब थोरात होणार पायउतार?
- ‘रिलायन्सला टार्गेट करून कृषी विधेयकांबाबत चुकीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न’
- ‘औरंगाबाद हे नाव दुर्दैवी; शिवभक्तांच्या अस्मितेचा विचार करुन सरकारने निर्णय घ्यावा’
- विलासकाका उंडाळकरांच्या अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये
- ग्रामपंचायत निवडणुकांची लढत आज होणार स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

