🕒 1 min read
मुंबई : कबीर सिंगच्या प्रचंड यशानंतर, अभिनेता शाहिद कपूर तेलुगु चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे. शाहिद या चित्रपटामध्ये एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. मार्चमध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजारात शूटिंग थांबविण्यात आले होते. अनलॉक नंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात करण्यात अली.
आता लवकरच त्याची ‘जर्सी’ फिल्म रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘जर्सी’च्या प्रदर्शनाबद्दल स्वतः शाहिदने चाहत्यांना माहिती दिली. ही फिल्म दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. शाहिदने जर्सी लुकचा फोटो शेअर करत लिहिलंय, ‘ सिनेमा दिवाळीला 5 नोव्हेंबर 2021 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होईल. हा आत्म्याचा विजय आहे. या प्रवासाचा मला अभिमान आहे. सर्व टीमला समर्पित!’
JERSEY releasing in theatres this DIWALI 5th November 2021. The triumph of the human spirit. A journey I am so very proud of. This ones for the TEAM …. @mrunal0801 @gowtam19 @GeethaArts@theamangill @SVC_official @SitharaEnts pic.twitter.com/WvDz7llMpv
— Shahid Kapoor (@shahidkapoor) January 17, 2021
काही दिवसांपूर्वी ‘जर्सी’चे शूटिंग संपल्याचे शाहिदने सांगितले होते. ऐन कोरोना काळात हे शूटिंग झाले होते. ‘कोरोना काळात 47 दिवस शूटिंग करणं कठीण होतं. पण मला माझ्या टीमचा अभिमान आहे. हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते. जे रोज जीव धोक्यात घालून सेटवर येत होते, त्या सर्वांचे मी आभार मानतो. ‘जर्सी’ची कहाणी प्रेरणादायी आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते-पाटील
- चंद्रकांत पाटील यांना धक्का; मूळ गावात शिवसेनेचा दणदणीत विजय
- नामांतर लढ्यातील योद्द्यांचा आठवलेंच्या हस्ते होणार सत्कार
- ‘बर्ड फ्लू’ची बाधा माणसांना होत नाही – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
- पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरे सत्राचा खेळ थांबवला; ऑस्ट्रेलियाकडे २७६ धावांची आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
