Share

शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी-प्रवीण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. महामंडळ आधीच तोट्यात असताना आता कोट्यावधींचा फटकाही बसला आहे. मागण्यासंदर्भात राज्य सरकार तोडगा काढणार असल्याचे सांगूनही कर्मचारी माघार घेण्यास तयार नाही. यातच कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपने पाठिंबा देत आक्रमक भूमिका घेतली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले होते. ‘राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.

यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भावनिक बोलून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे. त्यामुळे आम्हाला पोळी भाजण्याची गरज नाही’ असा घणाघाती आरोप दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केला आहे.

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करुन खाजगी बसेस सुरु करत आहेत. यातून काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा सवाल असून याची चौकशी झाली पाहिजे, असे दरेकर म्हणाले. एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे, हे चुकीचे असल्याचे दरेकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!