मुंबई : काल(१० नोव्हें.)माध्यमांशी संवाद साधतांना रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले की,’कुणी कोणता फोटो दाखवला तर तो सबंध असल्याचा पुरावा होऊ शकत नाही. रियाज भाटीचे फोटो नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आहेत. भाजपाकडे जी वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये घातले की सगळे स्वच्छ होतात. ती मशीन भाजपाने तयार केली आहे. गुंड, दाऊद, शकीलचे लोक आमच्याकडे असले तर याचा माणूस त्याचा माणूस…मात्र भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये गेला की एकदम चकचकीत शुभ्र होतो. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाकडे बोट दाखवू नये. महाराष्ट्रात रोज चिखलफेक सुरू आहे यांना कंटाळा कसा येत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इतर प्रश्नाकडे पाहायला हवं.’
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील आरोप-प्रत्यारोपांवरुन चिंता व्यक्त केली असून ते म्हणाले की,’दहशतवाद्यांशी संबंध आहेत असे आरोप कालपासून सुरु झाले आहेत. जे आरोप करत आहेत त्यांना सिद्ध करावं लागेल. कारण या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राची मोठी बदनामी होत आहे. यामुळे दोन्ही बाजूंना पुरावे सादर करावे लागतील, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे दहशतवाद्यांसोबत, बनावट नोटां छापणाऱ्यांसोबत संबंध आहेत असा आरोप झाला आहे. राज्याचे मंत्रीही दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. हे सिद्ध करावं लागले. पण काँग्रेससाठी जनतेचे मुद्दे महत्त्वाचे आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ
- ठाकरे सरकारचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढली
- राष्ट्रवादीचे सहकार पॅनेल जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात
- आम आदमी पक्ष खऱ्या हिंदुत्वाचे अनुसरण करत आहे; केजरीवालांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

