Share

‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुजरातमधल्या…’, एनसीबीवर राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहेत. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे एनसीबीचे चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही निशाणा साधल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील एनसीबीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की,’द्वारकेत ड्रग्ज सापडणं ही चिंतेची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना ज्यांनी पाव ग्रॅम वगैरे ड्रग पकडून जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली, एक ग्रॅम, पाव ग्रॅम, अर्धा ग्रॅम त्यांनी या ३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करावा. यापूर्वी गुजरातमध्ये साडेतीन हजार किलो ड्रग्ज सापडले होते, साधारण २५ ते ३० हजार कोटी किमतीचे. त्याच गुजरातमध्ये हे साडेतीनशे किलो म्हणजे १०० कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे. आता त्यामध्ये गुजरातमधली सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुलं अडकली असतील त्या लोकांनी पाहावं आता. एनसीबीचे पथक नक्की तिथे काय काम करत आहे गुजरातमध्ये हे सुद्धा देशाला कळावं’, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुजरातच्या द्वारकामध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ३५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले असून त्याच्याकडे तब्बल १७ किलो मेफेड्रोन आणि हेरोईन सापडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!