Share

मुख्यमंत्री ठाकरेंकडून नवाब मलिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांची रोज एकमेकांवर चिखलफेक सुरु असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मलिक आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणावरुन राजकारण पेटलं आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळाने मलिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.

क्रूझ प्रकरण खंडणी व वसुलीसाठी घडवून आणल्याचा पहिला आरोप नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केला होता. यानंतर मलिक यांनी एकामागून एक प्रकरणे व त्याचे पुरावे सादर करण्याचा धडाका लावला. गेल्या महिनाभर झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर भाजप नेते एनसीबी व समीर वानखेडेशी जोडले गेल्याचा आरोपही मलिक यांनी केला. याचे धागेदोरे मलिकांनी अगदी थेट फडणवीसांपर्यंत जोडले. यानंतर मलिक आणि फडणवीस यांच्यातसुद्धा चिखलफेक सुरू झाली.

मलिक यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीअगोदर नवाब मलिक यांनी फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड लोकांशी कसे संबंध आहेत याचा पाढा वाचला. त्यानंतर कॅबिनेट बैठकीसाठी पोहोचलेल्या मलिकांचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांनी कौतुक करत आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. भाजपला जशास तसे उत्तर देण्याची गरज असून आपण कोणतीही भीती व तमा न बाळगता त्यांना उत्तर देत आहात असे सांगितले.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा ‘वेल डन, तुम्ही उत्तम लढाई लढत आहात. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत’ अशा शब्दांत कौतुक केले. ‘नवाब मालिक यांनी घेतलेली भूमिका पुढे सुरू ठेवावी,’ अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी मलिकांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!