Share

‘देगलूरमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार, आघाडीच्या उमेदवाराचा शिवसेना प्रचार करणार’

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नाराज नेते सुभाष साबणे यांना शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. साबणे यांना शिवसेनेतून बडतर्फ करण्याचा निर्णय झाला आहे. साबणे यांनी भाजपमध्ये गेल्यानंतर शिवसेनेने देगलूर पोटनिवडणूकीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

देगलूरमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल. आघाडीच्या उमेदवाराचा शिवसेना प्रचार करेल, असं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं आहे. अनिल देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

शिवसेनेत बंडखोरी केलेले सुभाष साबणे यांना शिवसेनेत ना बडतर्फ करण्याचा निर्णय झालाय. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार नांदेडच्या पोटनिवडणुकीत निवडून येईल. शिवसैनिकानी शिवसेना भवनात येऊन तसा दृढ विश्वासच व्यक्त केला आहे, असं अनिल देसाई म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात मास्टर झालेली लोक आहेत. पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणस आहेत. शिवसेनेचे यामुळे मोठं नुकसान आहे, असे गंभीर आरोप करत सुभाष साबणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!