🕒 1 min read
पंढरपूर : काल शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या घरी देखील काल गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे. यावेळी पाटलांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ईश्वर चरणी साकड घातलं. शहाजीबापू पाटील यांनी गणपती बसवल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, मातोश्रीच्या दारात सुख, शांती दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना शहाजी बापू पाटील यांनी गणरायांकडे केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यानंतर आता शिवसेना नेत्यांनी पलटवार केलाय.
पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले यांनी पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. इंगोले म्हणाले कि, काय झाडी, काय डोंगर या डायलॉगवरून प्रसिद्ध झालेल्या शहाजी पाटलांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने अक्षरशः झोंबणारी टीका केली आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समदं कसं ओके…. आहे तर आधी याच खोक्यातून बायकोसाठी साडी घेऊन या असा सल्ला इंगोले यांनी दिलाय. सोशल मीडियात त्यांची ही पोस्ट तुफ्फान व्हायरल होतेय.
दरम्यान, दुसरीकडे शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आज जोरदार टोला लगावला आहे. यावेळी रामदास कदम बोलताना म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असे सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात, असा सवालच थेट त्यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉ़गबाजी थांबवावी, असेही रामदास कदम म्हणाले आहेत. सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाअंतर्गत कारवाई होणार? जाणून घ्या प्रकरण
- Ramdas Kadam । पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा बाळासाहेबांचे विचार आठवले नाहीत का?; कदमांचा ठाकरेंना टोला
- Dhananjay Munde | कोणतंही संकट माझी वाट अडवू शकत नाही ; धनंजय मुंडेंचे आक्रमक भाषण
- Ramdas Kadam । बाळासाहेबांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल करणार? रामदास कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना सवाल
- Amol Mitkari | काही लोकांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला – अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
