Share

‘शिवसेना उड्या मारायला लागली… एवढ्या लवकर डीजे वाजवू नका’ निलेश राणेंचा टोला

Published On: 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली असे शिक्कामोर्तब केले आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारवर आणि मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उभे करणाऱ्यांना शिवसेनेनं चांगलंच लक्ष्य केलं आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून अभिनेत्री कंगना रानौत आणि बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांंडे यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे. तर काँग्रेसने देखील याआधीच एम्सच्या अहवालानंतर विरोधकांवर निशाणा साधला होता. सामनाच्या आजच्या अग्रलेखात रानौत आणि पांडे यांच्यासह त्यांच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

यावर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार केला. ‘ SSR केसच्या AIIMS अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.’ अशी बोचरी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!