Share

‘…त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?’ शिवसेनेचा कंगनावर जहरी घणाघात

Published On: 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली असे शिक्कामोर्तब केले आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारवर आणि मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उभे करणाऱ्यांना शिवसेनेनं चांगलंच लक्ष्य केलं आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून अभिनेत्री कंगना रानौत आणि बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांंडे यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे. तर काँग्रेसने देखील याआधीच एम्सच्या अहवालानंतर विरोधकांवर निशाणा साधला होता. सामनाच्या आजच्या अग्रलेखात रानौत आणि पांडे यांच्यासह त्यांच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

‘ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!’ अशी बोचरी टीका केली आहे.

तर, ‘सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत.’ असा जहरी घणाघात देखील सामनातून कंगना रानौत आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर करण्ह्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!