🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचं संकट अद्यापही गेलेलं नाही. तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. सरकारकडून यावर उपाय योजना केल्या जात असतानाच आता देशात आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना नंतर आता निपाह या व्हायरसने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. केरळमधील १२ वर्षीय मुलाचा या निपाहमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर केंद्र सरकारने आपली एक टीम तात्काळ केरळला रवाना केली आहे. ३ सप्टेंबर रोजी केरळातील कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसचा संशयिताची नोंद झाली होती. ज्यामध्ये १२ वर्षीय मुलामध्ये इंसेफेलाइटिस आणि मायोकार्डिटिसची लक्षणे आढळून आली होती. यानंतर या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा निपाह विषाणू बाधित असल्याच्या वृत्ताला पुणे एनआयव्हीने दुजोरा दिला आहे. या मुलाच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलकडून केरळला तांत्रिक मदतीसाठी एक टीम रवाना केली आहे.
या घटनेनंतर केंद्र सरकारने तात्काळ पावलं उचलली आणि महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. मृत मुलाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. या सर्वांची तपासणी करुन नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने या वर्षी कसोटीत केल्या ‘इतक्या’ धावा; सर्व भारतीय फलंदाजांना टाकले मागे
- रोहितची शतकी खेळी, भारत ३ बाद २७०; तिसऱ्या दिवसाअखेरीस विराटसेनेकडे १७१ धावांची आघाडी
- शतकी खेळीसह रोहितनं गाजवले मैदान; मोडला मैथ्यू हेडनचा मोठा विक्रम
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
