मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका शिवसेनेने केली होती. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेने नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा, असा टोला लगावतानाच अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेने हिंदुत्वावर भाष्य करू नये. हिंदुत्वाचा खरा क्लास लावावा. नागपूरच्या कार्यालयात तुन्ही नेहमी जात असता. आताही जा आणि हिंदुत्व समजून घ्या, असा टोला शेलार यांनी लगावला.
शरजील उस्मानी याला पळवून लावण्यात आलं आहे. त्याला पळवून लावण्यास कोणी मदत केली. सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा हात आहे. एल्गारची पार्श्वभूमी माहीत असतानाही एल्गार परिषदेला परवानगी का देण्यात आली? असा सवाल करतानाच भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला दोन दिवसाने जाग आली. त्यानंतर शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर शिवसेना ही अमिबालाही लाज वाटेल अशा पद्धतीने दिशाहीन झाल्याचंच हे लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- सफारी पार्कचे काम धीम्या गतीने; निवीदाच्या तांत्रिक मुल्यांकनाचे काम संथगतीने
- खडसेंची अटक टळणार का ? ; आज होणार सुनावणी
- ऑलिम्पिकची तयारी सुरू; जपानमध्ये मात्र स्पर्धेलाला विरोध !
- राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर भाजपने काढला राहुल यांचा खापर पणजोबा!
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना

