मुंबई : महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेच्या सहाव्या जागी निवडून येण्यासाठी संभाजीराजे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे, मात्र यासाठी शिवसेनेने एक अट ठेवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. या पाश्वर्भूमीवर छावा संघटना प्रमुख धनंजय जाधव यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
“शिवसेना छत्रपतींसोबत जो अटी शर्थीनचा खेळ खेळत आहे. हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. तसच शिवसेने व्यक्तिरिक्त बाकी पक्ष जी बघ्याची भूमिका घेत आहेत, ते ही महाराष्ट्राला व आम्हाला आवडलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेने तात्काळ पाठिंबा जाहीर करावा नाहीतर मतांची बेरीज कशी गोळा करायची हे आम्हाला चांगलेच जमते”, असा इशारा छावा संघटना प्रमुख धनंजय जाधव यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

