Share

शिवसेनेने बिहारमध्ये ५० हुन अधिक जागा लढवाव्या; शिवसेना नेत्याची संजय राऊतांकडे मागणी

Published On: 

मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.

बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, पहिला टप्पा मतदानाची तारीख 28 ऑक्टोबर असणार आहे तर, दुसरा टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तिसरा टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर होणार आहे. तर बिहार निवडणुकीचा निकाल हा 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेने देखील मोठ्या प्रमाणात जागा लढवाव्यात अशी मागणी बिहारच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्याकडे केली आहे. बिहार शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी मुंबईमध्ये संजय राऊत यांची यासंदर्भात घेतली आहे.

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत उतरावे आणि 50 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. हा निर्णय शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं सांगण्यात येत आहे. बिहार विधानसभा निवडणूक शिवसेना याआधीही लढवत होती, त्यामुळे यावेळीही रिंगणात उतरण्याबाबत निर्णय घेऊ, असं काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होत.

बिहारमध्ये शिवसेना, फडणवीस आमने-सामने येणार?

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा २०१९ च्या निवडणुकांमध्ये ‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास असणाऱ्या फडणवीसांना राजकीय समीकरणांच्या उलथा-पालथीमुळे विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. राज्यात १०५ आमदार निवडून आणून राज्यातील यशस्वी पक्षाचे नेते असणाऱ्या फडणवीसांना सत्तेचं गणित जरी जमलं नसलं तरी त्यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे जर शिवसेनेने बिहार निवडणूक लढवली तर शिवसेना विरुद्ध फडणवीस असा सामना पाहायला मिळेल.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!