मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेसने दिला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा महाराष्ट्रा सह देशभरात काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेनेही आता या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपला निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे ट्विट करून असे म्हणाले कि, ‘मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती अशी करतो.’
देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना मी विनंती करतो.
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 2, 2020
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात जर बिहार पोलीस मुंबईला येऊन तपास करू शकतात तर मुंबई मध्ये यावर गुन्हा दाखल करून मुंबई पोलीस देखील उत्तर प्रदेश मध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास करू शकत नाहीत का ? असा उद्विग्न सवाल प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘देशात अराजक माजलं आहे,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी’
- मुंबई इंडियन्सचा नाद खुळा;किंग्ज इलेव्हन पंजाबचा दारूण पराभव करत गाठले अव्वल स्थान
- विवेक रहाडे यांच्या कुटुंबियांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट,पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले
- महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत : स्मृती इराणी
- पुण्यात युवा सेना नेत्याची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

