🕒 1 min read
मुंबई : अयोध्येतील राम मंदिर तीर्थक्षेत्र विकास ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून चौकशीची मागणी होतेय. तर शिवसेनेनही ‘अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असं म्हटलं आहे.
दरम्यान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिलं असून सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत असल्याचं म्हटलं आहे. भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. “सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!,” असा इशाराच त्यांनी दिला आहे.
सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे.
ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 14, 2021
“लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही,” असंही म्हटलं आहे. तसंच “शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे,” असंही सांगितलं आहे.
शिवसेनेने आता 'हजरत टिपू'चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 14, 2021
शिवसेनेचे हिंदुत्व कुठे गेले?
‘सर्व पुरावे समोर आले आहेत. आता हे सुर्यप्रकाशाइतकं स्पष्ट झालं आहे, राम मंदिर निर्माण कार्यात एक रुपया सोडा, एक पैशाचीही हेराफेरी झालेली नाही. अर्धवट माहितीच्याआधारावर शिवसेनेपासून अन्य पक्षांनी त्यांची साथ दिली, ज्या लोकांनी आमच्या साधू संतांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. राम भक्तांना रेतीच्या गोण्याबांधून शरयू नदीत टाकून दिलं, त्यांचं समर्थन शिवसेना करणार. काय झालय शिवसेनेला? कुठे गेलं त्यांचं हिुंदुत्व?’ असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.
काय आहे हे प्रकरण?
अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीवरून हा वाद उफाळला आहे. ही मुख्य मंदिराची जमीन नाही. मात्र येथे काही इतर मंदिरे उभी करण्याची परिषदेची योजना असल्याचे सांगितले जाते. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करताना त्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी किमतीची जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.
राम मंदिराच्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न
तसेच कुसुम पाठक या महिलेकडून १८ मार्च २०२१ रोजी १८ कोटी २० लाख रुपयांना जमीन खरेदीच्या व्यवहाराची नोंद करणारे अयोध्येतील ‘बिल्डर’ सुलतान अन्सारी हे आज अयोध्येतील घरातून सहकुटुंब बाहेर निघून गेल्याने वेगळे वळण मिळाले. विश्व हिंदू परिषद या आरोपांची स्वतंत्र चौकशी करेल, असे सांगतानाच विहिंपचे महासचिव चंपत राय यांनी सारे आरोप राजकीय असल्याचे सांगून फेटाळले आहेत. भाजपने राम मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये अडथळे आणणाऱ्या विघ्नसंतोषी शक्तींकडून हे आरोप सुरू आहेत आणि ते निराधार आहेत, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकार याची चौकशी करेल, असे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राम मंदिराच्या निधीत एका रुपयाचाही घोटाळा नाही, शिवसेनेने माफी मागावी’, राम कदमांची मागणी
- ‘या’साठी इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये ही शरद पवारांची इच्छा-राजेश टोपे
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; उदयनराजे, राणे की प्रीतम मुंडे? जाणून घ्या कोणाची लागणार वर्णी..
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
