मुंबई : अयोध्येतल्या वादग्रस्त आणि बहुचर्चित राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी रविवारी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाराचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराची सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणीही केली.
या मुद्द्यावर शिवसेनेनेही ‘सामना’तून भाष्य केलेय. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर देत भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करत राम मंदिराच्या निधीत एका रुपयाचाही घोटाळा झालेला नाही, शिवसेनेने माफी मागावी अशी मागणी केली आहे.
अब सभी सूरज की रोशनी की तरह यह स्पष्ट हो चुका है…
#राम_मंदिर_सेवा_समर्पण_निधी में महज एक भी रूपये का गफला नहीं हुआ है #शिवसेना समेत अन्य दलों ने हिन्दू समाज तथा हमारे #साधू #संतों को आहत किया हैवे हाथ जोडकर माफी मांगे.. pic.twitter.com/VnwSUarcKS
— Ram Kadam (@ramkadam) June 15, 2021
“आता हे सर्व सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आहे. राम मंदिर सेवा समर्पण निधी, एक रुपयाही खोटा ठरलेला नाही. शिवसेना यांच्यासह इतर पक्षांनी हिंदू समाज आणि आमच्या साधू संत यांना दुखावले आहे. त्यांनी हात जोडून माफी मागावी,” असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.
काय आहे आरोप?
राम मंदिरासाठी २ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेल्या जमिनीला ५ मिनिटे आणि ५ सेकंदाच्या कालावधीत १८.५ कोटी रुपयांना विकण्यात आले, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार पवन पांडेय यांनी केलाय. जमीन खरेदीचा सगळा खेळ महापौर आणि ट्रस्टी यांच्या संगनमतानं झाला, असंही त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; उदयनराजे, राणे की प्रीतम मुंडे? जाणून घ्या कोणाची लागणार वर्णी..
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

