पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवारांच्या आवाहनानंतर अनेक साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाका घेतला आहे. आपले राज्य आत्मनिर्भर व्हावे, स्वतःच्या पायावर आपण उभे राहावे अशी पवारांची अपेक्षा आहे. तसेच इतर राज्यांपुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची इच्छा आहे असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येत आहे. त्या बैठकीपूर्वी राजेश टोपेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
आशा वर्कर्सनी आंदोलन करणे योग्य नाही
आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. ते कुठलेही आंदोलन करणार नाही, असं ठरलं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत उचित आणि योग्य निर्णय राज्य सरकार घेईल. ज्या आशा वर्कर्स आंदोलन करत असतील तर ते चुकीचे आहे. आशा वर्करला सगळी मदत केली जातं आहे. ज्या मागण्या योग्य आहेत त्या मान्य केल्या जातील. मात्र त्यासाठी त्यांनी आंदोलन करणे योग्य नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.
केंद्राने बदल केल्यासच आरक्षण
केंद्र सरकारच्या कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. त्यांनी बदल करावा, आपण तो स्विकारणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे. हीच अपेक्षा महाविकास आघाडी सरकारची आहे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राम मंदिराच्या निधीत एका रुपयाचाही घोटाळा नाही, शिवसेनेने माफी मागावी’, राम कदमांची मागणी
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; उदयनराजे, राणे की प्रीतम मुंडे? जाणून घ्या कोणाची लागणार वर्णी..
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा


