Share

Uddhav Thackeray : शिवसेनेचे बंडखोर आमदार रात्री आठ वाजता मुंबईत येणार; उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना शांततेचं आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे सरकार विरोधात बंड केलं. सुरवातीला मुंबईतून सुरत आणि सुरतहुन आसामची राजधानी गुवाहाटी येथे हे आमदार रवाना झाले. सुरवातीला आमदारांचा आकडा स्पष्ट नव्हता. मात्र शिवसेनेचे जवळपास ३९ आणि अपक्ष ११ असे मिळून ५० आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. यानंतर राज्यपालांना भाजपने ठाकरे सरकारचे बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर हे आमदार गुवाहाटीवरून गोव्यात दाखल झाले.

बहुमत चाचणीसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्देश आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यानंतर ठाकरे सरकार कोसळले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होऊन आता दोन दिवस झाले यानंतर गोव्यात वास्तव करत असलेले आमदार आज रात्री 8 वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. गोव्याहून त्यांना मुंबईतील ताज प्रेसिडेंसी हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे.

उद्या सकाळी आठ वाजता भाजपाच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर विधानभवनात यांना एकत्र नेण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे. कारण या बंडखोर आमदारांविषयी शिवसैनिकांच्या मनात प्रचंड राग आणि संताप आहे. त्यामुळे कोणता अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. बंडखोरांना मुंबईत येवू द्या. कोणताही विरोध, निदर्शने करू नका, असे शिवसैनिकांना सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!