🕒 1 min read
अमरावती : मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. उदयपूरच्या धर्तीवर अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या आयुक्तांच्या अपयशामुळे झाल्याचे त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून म्हटले आहे. अमरावतीच्या पालकमंत्र्यांच्या दबावाखाली येऊन आरती सिंह या प्रकरणावर पडदा टाकण्याच काम करत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी यावेळी केला आहे.
अमरावती येथे एका केमिस्टची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २१ जून रोजी झालेल्या या खून प्रकरणात आतापर्यंत एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी इरफान खानचा शोध सुरू असल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले आहे.
इरफान एक एनजीओ देखील चालवतो. राजस्थानमधील उदयपूर येथे शिंपी कन्हैया लालच्या हत्येच्या एक आठवडा आधी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला होता. त्यानंतर आता हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या तपासातून काय बाहेर येतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे प्रकरण ?
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली होती. यावेळी अनेक राज्यात निदर्शनांना हिंसक वळनदेखील लागले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी उदपूर येथील टेलर व्यावयायिकाची त्याच्या दुकानात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून रोजी अमरावती येथील मेडिकल व्यावयायिक असणाऱ्या उमेश कोल्हे यांची २१ जूनच्या रात्री हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर भाजपने ही हत्या शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच झाल्याचा आरोप केला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
