🕒 1 min read
मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
‘बिहार विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० ते ५० जागा लढण्याबाबतचा आमचा विचार आहे. दोन दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. माजी पोलीस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? या प्रश्नावर त्यांनी दोन दिवस थांबा. सर्व चित्रं स्पष्ट होईल,’ असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं.
तर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी सुशांत प्रक्ररणात महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा वचपा काढण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संशय व्यक्त केला होता, त्यांना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असं विधान त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केलं आहे.
बिहार निवडणुकीत इतर पक्षांची डोकेदुखी वाढणार!
काही दिवसांपूर्वी बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना बिहारचे प्रमुख हौसलेंद्र शर्मा हे देखील उपस्थित होते. बिहार निवडणुकांमध्ये ५० जागा पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर,योग्य वेळी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असे संजय राऊत यांनी सांगितले होते.
सामनातून गुप्तेश्वर पांडे आणि कंगना रानौतवर निशाणा साधल्यानंतर बिहार निवडणुकांमध्ये शिवसेनेचा काय अजेंडा असेल हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान, शिवसेनेने मोठ्या प्रमाणात जागा लढवल्यास भाजपला मात्र त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकत. हिंदू मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा तिसऱ्या पक्षाला होण्याची स्थिती नाकारता येणार नाही.
दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणूक लढवल्यास काँग्रेसला देखील नुकसान होऊ शकते आणि महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून दोन मित्र पक्ष निवडणुकीत आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ ठरेल.
महत्वाच्या बातम्या :-
- जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला १०० किमी मागे ढकललं असतं-राहुल गांधी
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा; निलेश राणेंचे राहुल गांधींना आव्हान
- अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर; शौविकला दिलासा नाहीच!
- #Corona : नियम भंग करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द
- ‘१५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा ‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
