Share

जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला १०० किमी मागे ढकललं असतं-राहुल गांधी

Published On: 

नवी दिल्ली- गेले काही दिवस भारत आणि चीनमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. ग्ल्वान खोऱ्यात झालेल्या घटनेमुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शांतीच्या गप्पा मारणाऱ्या चीनची आगळीक दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे.

भारत-चीन संबंधांवरून खासदार राहुल गांधी यांनी भाजापवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असा छातीठोकपणे दावा गांधी यांनी केला आहे.

हरयाणामधल्या सभेत बोलताना त्यांनी हा अजब दावा केला. यावेळी बोलताना गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली वरुन स्वतःला मोदी देशभक्त म्हणवतात.

गांधी म्हणाले, चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये चीनच्या सैन्यानं पाऊल ठेवलं आणि आपली १ हजार २०० चौरस किमी जमीन हडप केली. जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं. चीनला १०० किमी मागे ढकललं असतं.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!