🕒 1 min read
औरंगाबाद : केंद्र सरकार पुरस्कृत केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र (CGHS) सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. हे केंद्र औरंगाबाद येथे व्हावे, यासाठी आपण वारंवार केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले असून, निती आयोगाच्या माध्यमातून आवश्यक बाबींची पुर्तता करावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
खैरे यांनी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात ४ ठिकाणी हे केंद्र आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथे लोकांना उपचारासाठी जावे लागते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय कर्मचारी, माजी सैनिक, स्वतंत्रसैनिक, संरक्षण विभागाचे कर्मचारी, निवृत्त वेतनधारक आदी आहेत. त्यामुळे हे केंद्र औरंगाबाद येथे होणे आवश्यक आहे.
या केंद्राचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो केंद्रीय कर्मचारी व वयोवृध्द नागरिकांना उपचारासाठी २०० ते ४०० किलोमीटर जावे लागणार नाही. या केंद्रामुळे दैनंदिन उपचाराबरोबर कोरोना तपासणी, उपचार, आणि निदान करणे सोपे जाईल. तसेच केंद्रीय कर्मचारी यांची होणारी धावपळ होणार नाही. या सर्व बाबींचा गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी चंद्रकांत खैरे यांनी अमिताभ कांत यांच्याकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना दिलासा ! आज ४५९ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
