Share

“रोहित पवारांची अलेक्साशी तुलना,” ; नितेश राणेंचं खोचक ट्विट

Published On: 

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे हे ट्विटर वर फार सक्रीय असतात. वेळोवेळी ट्विटच्या माध्यमातून आपल्या विरोधकांवर निशाणा साधत असतात. आता त्यांनी वेगळ्याच स्टाईलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अमेझॉन या प्रसिद्द विक्री संकेतस्थळावरील अलेक्साशी तुलना रोहित पवार यांच्याशी केली आहे. नितेश राणे यांचे ट्विट सध्या चर्चेत आहे.

आमदार रोहित पवार हे राजकीय घडामोडींवर आपले विचार सातत्याने सोशल मीडियावर मांडतात. दिवसभरातील केलेल्या सामाजिक व राजकीय कामांची माहिती व छायाचित्रे सोशल मीडियावर टाकतात. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. नितेश राणे यांनी ट्विटरच्या मध्यमातून सांगितले की, अमेझॉनकडे अॅलेक्सा आहे तर महाराष्ट्राकडे रोहित पवार आहेत. दोघांनाही सगळं काही माहीत असतं. फक्त अॅलेक्साला स्वीच ऑफ करता येते, मात्र रोहित पवारांना नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

रोहित पवार हे नुकतेच अयोद्धेत जाऊन आले आहेत. या यात्रेतून रोहित पवारांनी उत्तरेतील सर्वधर्मीय विविध तीर्थस्थळांना भेटी दिल्या आहेत. रोहित पवार यांनी विविध स्थळांना दिलेल्या भेटी छायाचित्रे, आपली राजकीय मते ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. ते सतत पोस्ट करत असतात. यावरून नितेश राणे यांनी रोहित पवार यांची तुलना अॅलेक्साशी केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!