Share

“…तोलून-मापून विधाने केली पाहिजेत”; संजय राऊतांचा नाना पटोलेंवर घणाघात

Published On: 

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीत भंडारा जिल्हा परिषदेत झालेल्या राजकीय नाट्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली, यावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण होईल का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

“नाना पटोलेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी शरद पवार आणि त्यांचे सर्व सहकारी समर्थ आहेत. मात्र महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्याने तोलून-मापून विधाने केली पाहिजेत. महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल अशा प्रकारे कोणी बोलू नये, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे”. असे संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले होते पटोले?

भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत मतभेद झाल्यानंतर नाना पटोलेंनी जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू,’ अशा शब्दांत पटोले यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नाना पटोले यांचं वक्तव्य हेडलाइन मिळवपुरतंच आहे, असे अजित पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!