मुंबई : देशाच्या अर्थसंकल्पात गुजरातच्या गिफ्ट सिटीला झुकते माप देण्यात आल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. “आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका”, असा इशारा संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी दिला आहे. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. “शिवसेना बाजीरावकी करते आहे. हे सचिन वाझेमुळे कळालेच आहे. जनता यांचेही साम्राज्य बुडवणार” अशी टीका भातखळकरांनी संजय राऊतांवर केली आहे.
मुंबई कोण ओरबाडते आहे हे सचिन वाजेमुळे लोकांना कळलेच आहे. गेली २५ वर्षे ही बाजीरावकी शिवसेना करते आहे. परंतु हे पहिले बाजीराव नसून दुसरे बाजीराव आहेत, ज्यांनी साम्राज्य बुडवले. जनता यांना बुडवणार हे नक्की. https://t.co/bUfpgPSJSr
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 2, 2022
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘मुंबई कोण ओरबाडते आहे हे सचिन वाझेमुळे लोकांना कळलेच आहे. गेली २५ वर्षे ही बाजीरावकी शिवसेना करते आहे. परंतु हे पहिले बाजीराव नसून दुसरे बाजीराव आहेत, ज्यांनी साम्राज्य बुडवले. जनता यांना बुडवणार हे नक्की.’ अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते. “एखाद्या राज्याच्या प्रगतीने आमच्या पोटात दुखण्याची आवश्यकता नाही पण ते करण्यासाठी मुंबईची धूळधाण करणं चालू आहे. मुंबई देशाला सव्वा दोन लाख कोटी रुपये देते. त्यामुळे आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका नाही तर मुंबईचे ते पैसे परत करा”, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले होते.
“गुजरातच्या गांधीनगरमध्ये उभारली जाणारी गिफ्ट सिटी (Gift City project in Gujarat) ही नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात या गिफ्ट सिटीला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्यात येणार आहे. दरम्यान सध्या मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र कार्यरत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे पाच वर्षांपूर्वी लवाद केंद्र सुरु करण्यात आले होते. परंतु, आता गुजरातमध्ये नवे आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र उभे राहिल्यास मुंबईला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.” असे संजय राऊत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

