🕒 1 min read
मुंबई: पेगासस (पेगासस) विरोधात आज मुंबईत काँग्रेसकडून आंदोलन होणार होते पण त्याअगोदरच भाजपचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू करत काँग्रेसविरुद्ध आपला मोर्चा उभारला. तसेच प्रसाद लाड आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुद्धा पाहायला मिळाली. मुंबईत काँग्रेससने भाजपच्या दादर कार्यालयासमोरच आपले आंदोलन सुरू केले होते. याच पार्श्वभूमीवर लाड यांनी देखील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आपला मोर्चा उभा केला व दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तूफान खडाजंगी झाली.
लाड यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते अंगावर आल्याचा आरोप करत ते अंगावर आले तर आम्ही खपवून घेणार नाही, त्यांच सरकार आहे म्हणून काहीही करतील का? अशी घोषणाबाजी करत काही वेळ पोलिसांसोबत शाब्दिक वाद घातला.
या आंदोलनात कॉँग्रेसचे आमदार झिशान सिद्धीकी यांना ताब्यात घेतले आहे. दोनही बाजूचे कार्यकर्ते पोलिसांना ऐकत नसल्याने पोलिसांनी शेवटी धरपकड चालू करत अनेकांना ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
दादाच्या शो मध्ये येणार “काचा बदाम” फेम भुबम ; व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेत
-
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसीचे रूग्णालय उभारणार-कामगार मंत्री हसन मुश्रीफ
-
विराट कोहलीच्या खास खेळाडूने उघड केले गुपित, सांगितले आयपीएलच्या पहिल्या कमाईतून काय खरेदी केले?
-
भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेला ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटमधून अटक, काय आहे नेमकं प्रकरण
-
“आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका”, संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
