बिहार : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघ असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
‘शिवसेनेतर्फे बिहार विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० ते ५० जागा लढण्याबाबतचा आमचा विचार आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना बिहारचे प्रमुख हौसलेंद्र शर्मा हे देखील उपस्थित होते. बिहार निवडणुकांमध्ये ५० जागा पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर,योग्य वेळी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असे संजय राऊत यांनी सांगितले होते.
दरम्यान, बिहार निवडणुकांमध्ये जेडीयू या पक्षाचं देखील बाण हे चिन्ह असल्यानं मतदारांमध्ये घोळ होतो अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शिवसेनेला पर्यायी चिन्ह वापरावं अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार शिवसेनेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट अशा तीन चिन्हांपैकी एक मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘बिस्कीट’ चिन्ह दिले आहे. यावर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाला चिन्ह बलून मिळावं यासाठी पत्र लिहिल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.
लॉकडाऊन नंतरची पहिलीच निवडणूक!
बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, पहिला टप्पा 28 ऑक्टोबर असणार आहे तर, दुसरा टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तिसरा टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर होणार आहे. तर बिहार निवडणुकीचा निकाल हा 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

