धुळे:- एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात सोमवारी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.
शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, भाजपची सत्ता गेल्यामुळे ते शिवसेनेवर टिका करत आहे. सत्तेसाठी शिवसेना कधीच कुणासमोर नतमस्तक होत नाही. ही बाळासाहेबांची सेना आहे. शरजील उस्मानीचे वक्तव्य, त्याचा अर्थ आणि उद्देश तपासून त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, असे सांगतानाच शिवसेनेला कुणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपला लगावला आहे.
तीस वर्ष शिवसेनेसोबत असलेल्या भाजपला आताच शिवसेना वाईट कशी दिसू लागली, असा सवाल सत्तार यांनी केला आहे. इतके दिवस भाजप सत्तेच्या म्हणजेच अंब्याच्या झाडाखाली होती, आता बाभळीच्या झाडाखाली आहे, त्यामुळे ते शिवसेनेवर टीका करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली’
- भीती आणि दहशतीमुळे काही प्रमुख लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत : संजय राऊत
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- “…तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते?”
- अमेरिकेचा कृषी कायद्यांना तर उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांची भाचीचा शेतकऱ्यांना पाठींबा !

