कोल्हापूर : शिवसेनेने पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. कोल्हापूर शहरात शिवसंपर्क अभियानच्या उदघाटनप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते यावेळी त्यांनी सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्री नारायण राणे आणि भाजपवर नामोल्लेख टाळून टीकास्त्र केले आहे. राज्यात चार नव्हे तर ४० केंद्रीय मंत्री केले आणि कोकणातील पंतप्रधान केला तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, अशी टिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नूतन सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्री नारायण राणे आणि भाजपवर नामोल्लेख टाळून मंगळवारी केली.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला एक नंरबचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘शिवसैनिकांनो, शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान बारा दिवसांत जोमात राबवून जे तुम्हाला छळतात त्यांचे निवडणुकीत बारा वाजविण्यास सज्ज व्हा,’ असे आवाहन उदय सामंत यांनी आज येथे केले. ‘कोकणातून कोणी पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही. इतकेच काय तर चार नव्हे चाळीस मंत्री झाले तरी हरकत नाही,’ असेही ते म्हणाले.
यावेळी सामंत म्हणाले, ‘शिवसेनेचे वेगळेपण जगाने स्विकारलेले आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेक्षणात देशातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नोंद झाली. तोच इतिहास उद्धव ठाकरे यांचा आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. त्यामुळेच शिवसेना व नेत्यांची बदनामीचे षडयंत्र आखले जात आहे. याउलट मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी घराघरात आदर आहे. परिणामी कोणी कितीही शंखध्वनी केला तरी फरक पडत नाही.’ असे ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुमचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?’; वाचा नारायण राणे यांचं खास पत्र
- ‘शिवसेनेलाच आता युतीची गरज असेल’; निलेश राणेंचा टोला
- ‘गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचा भाजपाने वापर करुन नंतर त्यांना डावलले’
- कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका, औरंगाबाद पालिका ९२१ बेडसह सज्ज!
- ‘पडळकरांनी पात्रता ओळखून भाष्य करावं, तोंडाला येईल ते बोलून स्वतःचा पचका करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

