🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांतर्फे वर्तवण्यात आला आहे. या लाटेत लहान बालकांना सर्वाधिक धोका असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झाले असून शहरात बालकांसाठी एक कोविड केअर सेंटर, ९ डीसीएचसी आणि १० डीसीएचमध्ये ९१९ बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मेधा जोगदंड यांनी दिली.
तसेच शहरातील गरवारे कंपनीमध्ये १२५ बेडचे बाल कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. या सेंटरमध्ये एक ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांवर उपचार केले जातील. बारा ते अठरा वयोगटातील बालकांसाठी एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्समधे १०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. तसेच मेल्ट्रॉनमध्ये ५० बेड या प्रमाणे २७५ बेडची तयारी बालकांसाठी करण्यात आली आहे. त्यासोबतच मनपाच्या एन-८ येथील आरोग्य केंद्रात कोविड झालेल्या महिलांच्या प्रसुतीसाठी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपामध्ये असलेल्या डॉक्टरांसह कर्मचार्यांना बालकांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ६ पिडीयाट्रिक डॉक्टर्स, ८ एमबीबीएस, १४ बीएएमएस, १८ स्टाफनर्स, ८ जीएनएम याप्रमाणे ५४ जणांना १४ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासोबतच प्रसुतीगृहात कोविड महिलांसह नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी १६ जणांना प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच बाल कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी ८ बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांना घेण्यात आले आहे. कोरोनामध्ये गंभीर झालेल्या बालकांसाठी ४५ व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दहा डीएचसीमध्ये ४९ आणि ९ डीसीएचसीमध्ये ६ व्हेंटिलेटर असणार आहेत. हे व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का ?’
- राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील महिला असुरक्षित – वनीथा श्रीनिवासन
- मोठी बातमी : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पोहचले राहुल गांधींच्या भेटीला
- मला विश्वास आहे पंकजा मुंडे या पक्षापासून दूर जाणार नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे
- भुमरेंनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, शेत बळकावल्याचा महिलेचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
