Share

शिवसेना लाचार होत नाही दुसऱ्याला लाचार करते- संजय राऊत

Published On: 

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आलीय. यानिमित्तानं शिवसेना खासदार संजय राऊत आज दादरा नगर हवेलीत आहेत. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला.

शिवसेना लाचार होत नाही दुसऱ्याला लाचार करते. स्वाभिमानचा मुद्दा आहे. स्वाभिमानाचं दुसरं नाव शिवसेना आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.  रेल्वेमंत्री प्रचाराला येत आहेत, इतर मंत्रीही येतील, हवं तर जो बायडन यांना प्रचाराला आणा शिवसेना घाबरत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

सिल्वासाच्या विकासाचे मुद्दे 20 वर्षांपासून प्रलंबित आहेत. मोहन डेलकर इथं 7 वेळा निवडून आले. त्यांचा दोन वेळा कसा पराभव करण्यात आला हे सर्वांना माहिती आहे. शिवसेना स्वाभिमानाचं दुसरं नाव आहे. शिवसेना लाचार होत नाही इतरांना लाचार बनवते, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना 2024 मध्ये राष्ट्रीय पातळीवर उतरेल त्याची सुरुवात सिल्वासामधून होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!