Share

Shivsena : शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच ; विधानमंडळच्या पत्राने शिक्कामोर्तब

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत मतभेदामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर सेनेला जशी गळती लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदारांचा गट तयार झाला असल्याची चर्चा आहे. तर आता सेनेकडे फक्त १५ आमदारांचा पाठींबा आणि साथ आहे. यावरूनच भाजपकडून सतत शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने ‘शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयाला’ पत्र पाठविले आहे.

विधानमंडळ सचिवालयाने पाठविलेल्या या पत्रात स्पष्ट लिहिले आहे कि, “संदर्भाधिन पत्राच्या अनुषंगाने मला आपणांस असे कळविण्याचे निदेश आहेत की, उक्त पत्राव्दारे करण्यात आलेली श्री. अजय चौधरी, विधानसभा सदस्य यांच्या शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या गटनेते पदी केलेल्या निवडीस मान्यता देण्याची विनंती मा. उपाध्यक्ष (कार्यकारी अध्यक्ष), महाराष्ट्र विधानसभा यांनी मान्य केली आहे”.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ला रामराम ठोकला आहे. तर शिंदेंसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी आसाममध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!