🕒 1 min read
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. आता या पार्शवभूमीवर अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती . पोस्ट शेअर करत ती म्हणाली, ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं? आता या पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं? असा प्रश्न हेमांगीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विचारला होता आता यावर खूप लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘या महाराष्ट्रात फक्त दोनच वाघ होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज’, अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनाच’. हेमांगीच्या या पोस्टबद्दल एका युजरने तिचं कौतुक देखील केले आहे. ‘काही मोजक्याच सेलिब्रिटींमध्ये राजकीय पोस्ट करण्याची हिंमत आहे. तू त्यापैकी एक आहेस, म्हणून मला आवडतेस’, असं देखील युजर्स म्हणाले आहेत.
https://www.instagram.com/p/CfJtqawqdtR/
हेमांगी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तिने तिचे मत व्यक्त केले आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
