Share

शिवसेना आणि महाराष्ट्र येड्यागबाळ्यांसमोर झुकणारा नाही- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आज(१० फेब्रु.) दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्यामागे राक्षस लावले जात असल्याची टीका केली आहे. तसेच यासंदर्भात मुंबईत गेल्यानंतर सविस्तर बोलणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘कितीही खोटं बोला, दबावतंत्राचा वापर करा, पुरावे उभे करा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या परंतु शिवसेना आणि महाराष्ट्र या येड्यागबाळ्यांसमोर झुकणारा नाही.’ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आणि आता शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसारखी इतर नेतेमंडळी असतील. हा महाराष्ट्राचा बाणा आहे आणि तो कायम राहील, असेही राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘शिवसेनेचा नेता आणि बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून सत्य बाजू लोकांसमोर मांडण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे आता जे काही बोलायचे ते मी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत जाऊन बोलणार आहे’, असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!