मुंबई – शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्यावे या मागणीसाठी शिवसैनिक गिरीश व्यास हे यवतमाळ ते मुंबई सायकल वारी करणार आहेत. हा प्रवास 700 किमीचा आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्याचं साकडं घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
यवतमाळ येथून ते मुंबई दादर येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत जाण्यासाठी निघाले आहे. पुढील 8 दिवसात ते मुंबईला पोहचतील.दरम्यान, पूजा चव्हाण या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते.
विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते.पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘जलयुक्त शिवार योजनेवर कॅगचा ठपका, यात राजकारण नाही’, बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण
- मोठी बातमी! माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल
- ‘कोरोना योद्ध्यांच्या ५० लाखांच्या विम्याचा निर्णय ५ ऑगस्टपर्यंत घ्या’, मुख्य सचिवांना निर्देश
- ‘मुंबईत ८० टक्के टक्केवारी आणि २० टक्के नालेसफाई’, अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला
- एसबीआयमध्ये ३ लाखांपर्यंत पीककर्ज देण्यात यावे, खा.ओमराजेंची अर्थराज्यमंत्री कराडांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

