Share

एसबीआयमध्ये ३ लाखांपर्यंत पीककर्ज देण्यात यावे, खा.ओमराजेंची अर्थराज्यमंत्री कराडांकडे मागणी

Published On: 

उस्मानाबाद : भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखांमध्ये पीक कर्ज ३ लाख रुपयांपर्यंत मंजुर करण्याचे अधिकार व्यवस्थापकांना देण्यात यावेत अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची दिल्ली येथे भेट घेत निवेदन दिले आहे.

खा.ओमराजे यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात तसेच महाराष्ट्रात भारतीय स्टेट बँकेच्या अनेक शाखा ग्राहकांच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. परंतु आरएसीसीकडे जिल्ह्यातील विविध शाखांमधील कर्जाच्या संदर्भात कर्जाची प्रकरणे प्रस्तावित आहेत. ज्यामुळे पीक कर्जाची कामे करण्यास ६ ते १२ महिने लागतात. त्यामुळे शेतकरी व बँक कर्मचाऱ्यांना बरेच दिवस प्रक्रिया आणि मंजुरी होईपर्यंत थांबावे लागते. या सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज वितरण करण्यास परवानगी नसल्याने व बँकेतील कर्मचारी रिक्त पदे असल्याने पीक कर्ज वाटपास बरेच दिवस विलंब लागत आहे.

लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात तसेच महाराष्ट्रात भारतीय स्टेट बँकेच्या अनेक शाखा ग्राहकांच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. परंतु आरएसीसीकडे जिल्ह्यातील विविध शाखांमधील कर्जाच्या संदर्भात कर्जाची प्रकरणे प्रस्तावित आहेत. ज्यामुळे पीक कर्जाची कामे करण्यास ६ ते १२ महिने लागतात. त्यामुळे शेतकरी व बँक कर्मचाऱ्यांना बरेच दिवस प्रक्रिया आणि मंजुरी होईपर्यंत थांबावे लागते. या सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज वितरण करण्यास परवानगी नसल्याने व बँकेतील कर्मचारी रिक्त पदे असल्याने पीक कर्ज वाटपास बरेच दिवस विलंब लागत आहे.

या सर्व स्थितीचा विचार करता भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज ३ लाखापर्यंत मंजुरी अधिकार देणे व बँकेतील रिक्त पदे भरावीत,यासंदर्भातील मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी डॉ. कराड यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!