Share

कृषिमंत्री दादा भुसेंच्या ‘त्या’ माहितीवरून वाद, मालेगावात काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक

Published On: 

नाशिक : मालमत्तांच्या ‘ब’ सत्ता मिळकत प्रकरणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. या आरोपांमुळे संतप्त शिवसैनिकांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. घोषणा देत निदर्शने करून कार्यालयावर शासन आदेशाची प्रत चिटकवून निषेध केला.

यासंदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीचा हवाला देत कृषिमंत्री भुसे यांचे आवाहन दिशाभूल करणारे असल्याचे जाहीर पत्रक काढले. ही संपूर्ण माहिती चुकीची असून भुसे यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नितीन बच्छाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला होता. याची सोशल मीडियावर देखील चर्चा झाल्याने शिवसेना महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी यांनी तत्काळ भुसे यांच्या संपर्क कार्यलयात पत्रकार परिषद घेऊन मंत्री भुसे यांनी ‘ब’ सत्ता मिळकत प्रकरणी २००४ पासून केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. या संदर्भातील शासन आदेश दाखवले.

स्थानिक काँग्रेसकडून द्वेषापोटी मंत्री भुसे यांच्या विरोधात प्रचार सुरू केल्याचा आरोप मिस्तरी यांनी केला. तसेच संतप्त झालेल्या शिवसेनेचे महानगर प्रमुख मिस्तरी, प्रमोद शुक्ला, राजेश अलिझाड व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी कृषी मंत्री भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मंत्री भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. यानंतर काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली.

मंत्री भुसे यांनी ‘ब’ सत्ता मालमत्ताप्रकरणी केलेला पाठपुरावा व शासन आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांनी पहावा. ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्री भुसे यांच्यावर दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे, त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्या घरासमोर जाऊन शिवसैनिक आंदोलन करतील, असा इशारा शिवसेना महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!