मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील आपसी भांडण वाढत चालले आहे. एकीकडे बंडखोर एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी दोनतृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे संघटना मजबूत करण्याबरोबरच सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशातच आज शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमध्ये असलेल्या कार्यालयावर शिवसेनेच्या संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक करत कार्यालय फोडले आहे. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

