Share

Eknath Shinde | दसरा मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांसाठी शिंदे गटाने दिली ‘इतके’ लाख फूड पॅकेट्सची ऑर्डर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संपुर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या दसरा मेळाव्या काहीच तास शिल्लक राहिले आहेत. शिवसेना पक्षात दोन गट पडल्यामुळे उद्या शिवतीर्थावर आणि बीकेसी मैदानवर, असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिलाच दसरा मेळावा (Dussehra Melawa) असल्याने शिंदे गट जोरदार तयारी करत आहेत. यावेळी सर्व आमदारांवर वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या असून ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या पेटपूजेची जबाबदारी उचलली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून अडीच लाक फुड पॅकेट्सची ऑर्डर :

दसरा मेळव्यासाठी बीकेसी मैदानावर येणाऱ्या शिवसैनिकांसाठी तब्बल अडीच लाख फुड पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. ठाणयातील प्रशांत काॅर्नर नावाच्या मिठाईच्या दुकानवाल्याला ही ऑर्डर देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून कमीत कमी ३ लाख कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज आहे.बीकेसी मैदानावर मेळावा संपल्यानंतर हे फूड पॅकेट्स दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रशांत कॉर्नरच्या कारखान्यात सध्या फूड पॅकेटस तयार करण्याची लगबग सुरु आहे.

शिवसेनाच्या दसरा मेळाव्याने राज्यातील राजकरणात चांगलीच आफडा-तफड माजवली होती. सर्व पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही तर हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. मात्र, याचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला. त्यामुळे एकनाथ शिंदे गट मोठी गर्दी जमवण्यासाठी खाटापीट करत आहे.

गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया :

आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा आहे, मात्र, उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) दसरा मेळावा शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) मिक्स विचारांचा होणार असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) केली होती. आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल!, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!