Share

Election Commission | शिवसेना कुणाची? निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये, दोन्ही गटाकडे केली ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता संपूर्ण शिवसेना पक्ष हस्तगत करण्याच्या तयारीत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबतचा आता निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. दरम्यान निवडणूक आयोग सुद्धा आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून काही कागदपत्रे निवडणूक आयोगाने मागितील आहे.

शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील कायदे तज्ज्ञांनी चर्चा केली आहे. उद्या शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आहे. याचबरोबर अंधेरीतील पोट निवडणूक देखील तोंडावर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्ह आता नेमकं कुणाल मिळतं. ते पाहणे महत्वाचे असेल.

किती आमदार, खासदार तसेच पदाधिकारी सोबत आहेत. याचा तपशील निवडणूक आयोगाला दोन्ही गटाला द्यायचा आहे. शिवसेनेने धनुष्यबाणावरती आपला दावा केला आहे. तर शिंदे गटाने बहुमत असल्याचे सांगत धनुष्यबाण आपलाच असल्याचे म्हटले आहे. तसेच मुळ शिवसेनेवर देखील दावा केला आहे.

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यास?-

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यास, नव्या चिन्हांसह लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. यासाठी ठाकरेंनी टीम देखील तयार केली आहे. पहिली निवडणूक आहे, असं समजून लढायचं, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

उद्धव ठाकरे लागले तयारीला-

शिवसेनेने पहिली निवडणूक चिन्ह नसताना लढवली होती. शिवसेनेने १९६७ साली प्रजा समादवादी पक्षासोबत युती केली होती. शिवसेनेचे तेव्हा ४२ नगरसेवक निवडूण आले होते. बहुमत असल्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे जाऊ शकतो त्यामुळे उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत.

धनुष्यबाण कुणाचा?

निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सांगितले की, एक तर चिन्ह शिंदे गटाकडे जाईल किंवा उद्धव ठाकरे गटाकडे जाईल. दोन्ही गटाकडे चिन्ह गेले नाही तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात येणार. कुरेशी एका मुलाखतीत म्हणाले, दोन्ही गटाचे दावे तपासले जातील. तसेच प्रत्येकाची सही तपासली जाईल. दोन्ही गट आपले दावे मांडतात, या सगळ्या प्रोसेसला ४ ते ५ महिने लागतात. या दरम्यान निवडणुका झाल्या तर निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवतात आणि दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपात नाव आणि चिन्ह देतात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!