🕒 1 min read
Amol Mitkari | मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण आहेत या बाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाल्या आहेत.
तसेच महाविकास आघडीतील अनेक मोठे नेते शिंदे सरकार लवकरच कोसळणार असल्याची भविष्यवाणी वारंवार करतायत. यावेळी दीड महिन्यापेक्षा जास्त शिंदे फडणवीस सरकार टिकणार नसल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला आहे. दीड महिन्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष असेल, अशा विश्वासही मिटकरींनी व्यक्त केला आहे.
तर सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली तर २० लाख रुपये येतील. मात्र, इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरु आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली आहे. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊत, अशी ऑफर देण्यात आल्याचेही मिटकरी म्हणाले.
दरम्यान, याआधी आम्ही भाजप सारख्या पिपाण्या वाजवणार नाहीत. हे सरकार कधी पडणार याच्याही तारखा देणार नाहीत. त्यांना जे काही पिपाण्या, सनई, चौघडे वाजवायचेत ते वाजू द्यात. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. अंतर्गत कलहाने हे सरकार लवकरच कोसळेल असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे. दोघेच जण मिळवून सरकार चालवत आहेत. सध्या राज्यात हम दोनो एक दुजे के लिये असच चाललंय, असा टोलाही संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | वाढदिवसादिवशी पंकजा मुंडे होणार गायब, पहा काय कारण…
- Amol Mitkari : “विधानपरिषद निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले”; अमोल मिटकरींचा मोठा दावा
- Sharad Ponkshe | सावरकरप्रेमी आला म्हटलं की दहशत वाटली पाहिजे- शरद पोंक्षे
- CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी नेहमीच माझा सन्मान केला, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
- Krunal Pandya : कृणाल पंड्या बनला बाप! पोस्ट शेअर करत मुलाच्या नावाचाही केला खुलासा, पाहा PHOTO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

