Share

Sharad Ponkshe | सावरकरप्रेमी आला म्हटलं की दहशत वाटली पाहिजे- शरद पोंक्षे

Published On: 

🕒 1 min read

पुणे : अभिनेते आणि शिंदे गटाचे उपनेते शरद पोंक्षे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच ते असेही म्हणाले कि, “महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे, प्रत्येक गावात असे विद्यालय हवे, असे कार्यक्रम व्हायला हवेत. या मुलांनी खूप छान कार्यक्रम केला, मला सगळ्या शिक्षकांना नमस्कार करायचा आहे. असे शिक्षक प्रत्येक शाळेत हवेत. अशी संकल्पना सुचणं आणि अंमलात आणणं अवघड असतं. माझ्याकडे खरोखरच आज शब्द नाहीत. मी खरोखरच कौतूक करतोय, मी अभिनेता आहे म्हणून मी असं बोलत नाही, तर खरोखर बोलतोय”, असे देखील ते यावेळी म्हणाले.

अभिनेते शरद पोंक्षे पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या कार्यक्रमाची मूळ संकप्लना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित होती. या कार्यक्रमाला शरद पोंक्षे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, “मी कार्यक्रम पाहताना रडलो. ज्या मनापासून तुम्ही सगळे सावरकर सर्वांपर्यंत पोहचवत आहात, गाणी गात आहेत त्यांचे अर्थ सांगत आहेत. ते खरंच छान आहे.”, असे म्हणत त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि सदारकर्त्यांचे कौतुक केले.

पुढे ते असेही म्हणाले कि, “सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे. यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाटली पाहिजे अजून वाढली पाहिजे. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती, काँग्रेसला पण आहे अन ती दहशत वाढली पाहिजे. सध्या कोणी विरोधात बोलला तरी त्याला उत्तर देण्यासाठी ताकद आणि शब्द नसतात. त्यामुळे उत्तर देणारे कमी अन आक्षेप घेणारे जास्त आहेत, मात्र हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय. याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर याचं मोठेपण मान्य करणे म्हणजे त्याचा राजकीय तोटा आहे. त्यामुळे कितीही सांगितले तरी ते ऐकणार नाहीत. सावरकर यांच्यावर बोलणाऱ्यांपेक्षा आक्षेप घेणारेच जास्त आहेत. आता कोणी तरी या कार्यक्रमाला आले आणि गेले. ते कशाला येतात कोण होते माहिती नाही. त्यापेक्षा राजकीय व्यक्ती नाही आल्या तरी काही फरक पडत नाही. मनापासून प्रेम करणारी माणसे हवीत फक्त. जे आलेत त्यांचे आभार. पण हे राजकिय लोक येत नाही ना म्हणून यांच्या डोक्यात काही शिरत नाही आहे”, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!