Share

Amol Mitkari : “विधानपरिषद निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले”; अमोल मिटकरींचा मोठा दावा

Published On: 

🕒 1 min read

Amol Mitkari | मुंबई : राज्यात राज्यसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. तर भाजपने यश संपादन केलं. तर यानंतरच महाविकास आघाडीच्या ऱ्हासाला सुरवात झाली. एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजप सोबत जात राज्यात नवं सरकार स्थापन केलं. यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा खळबळजनक आरोप अमोल मिटकरी यांनी केला. प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनीही त्यांनी केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण आहेत या बाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाल्या आहेत.

यावेळी पुढे बोलताना मिटकरी म्हणले कि, सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली तर २० लाख रुपये येतील. मात्र, इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरु आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली आहे. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊत, अशी ऑफर देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!